हवन किंवा यज्ञाला आपल्या हिंदू संस्कृतीत अनादी-अनंत काळापासून अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. हि शुद्धीकरणाची विधी आहे. हवन कुंडात अग्नीद्वारे श्री मंगळ देवाची पूजा केली जाते. यज्ञ समिधा व हवनात्मक सामग्रींची आहुती दिली जाते.
आपल्या आयुष्यातील दुःख, कष्ट, संकटे किंवा प्रलंबित प्रश्न आदींच्या निर्मुलनासाठी व भरभराटीसाठी श्री मंगळ देवाची हवनात्मक पुजा / शांती केली जाते.
हवनात्मक शांती पुजेमध्ये ५ चौरंग मांडुन त्यात गणपती पुण्याहवाचन, मातृका पूजन , श्री मंगळाचे पुजन नवग्रह मंडलाचे पुजन, रुद्रकलश पुजन तसेच हवन केला जातो.
होमहवनात्मक पुजेसाठी इच्छुक भाविकांनी मंदीरातील मुख्य पुरोहीतांच्या मार्गदर्शनाने / नियोजनाने अभिषेक पुजेची/ शांतीची तयारी करावी ही शांतीपूजा करतांना कुटुंबातील व्यक्तीही पुजेला उपस्थित राहू शकतात. यासाठी लागणारी दक्षिणा प्रत्यक्ष हवनात्मक अभिषेकापूर्वी संस्थेच्या बँक खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे. किंवा मंदिरात समक्ष येवून देणे आवश्यक आहे. मंदिरात समक्ष येऊन अथवा ऑनलाईन पध्दतीने या अभिषेकासाठी वेळ नोंदणी (अॅडव्हान्स बुकिंग) करावी लागते.
वार - मंदिर व्यस्थापनाशी संपर्क साधून तारीख मिळवावी.
वेळ- 3 तास
दक्षिणा- ६३००/
पंचामृत अभिषेक
Read More
दर मंगळवारी श्री मंगळ देवाच्या मंदिरात प्रत्यक्ष देवाच्या मुर्ती जवळ बसून श्री मंगळदेवावर होणा-या पंचामृत अभिषेकाचा मान एकावेळी फक्त एकालाच (सहकुटूंब) मिळतो. मंदिरात समक्ष येऊन अथवा ऑनलाईन पध्दतीने या अभिषेकासाठी वेळ नोंदणी (अॅडव्हान्स बुकिंग) करावी लागते.
पंचामृत अभिषेक फक्त दर मंगळवारीच होत असल्याने नोंदणी केलेल्या भाविकांच्या संखेनुसार अभिषेकासाठी आपला क्रमांक लागत असतो. मंदिर व्यवस्थापना कडुन साधारण ३ ते ४ दिवस आधी नोंदणीकृत भाविकांशी संपर्क साधला जातो भाविकांना पूजेची संपूर्ण माहिती दिली जाते. त्यांच्याकडून अभिषेक करून घेतला जात असतो. यासाठी लागणारी दक्षिणा प्रत्यक्ष अभिषेकापूर्वी संस्थेच्या बँक खात्यात मंगळवारी जमा करणे अत्यावश्यक आहे. किंवा मंदिरात समक्ष येवून देणे.
सकाळी ७ वाजता होणाऱ्या महाआरतीचा मानही पंचामृत अभिषेक करणाऱ्या भाविकालाच मिळतो.
वार- मंगळवार
वेळ - सकाळी ५.०० ते ७.०० (२ तास )
दक्षिणा- ७२००रु
नित्यप्रभात श्री मंगलाभिषेक
Read More
मंगळवार सोडुन (सोमवार, बुधवार,गुरुवार,शुक्रवार,शनिवार,रविवार) या दिवशी श्री मंगळ देवाच्या मंदीरात प्रत्यक्ष देवाच्या मुर्ती जवळ बसून मंगळदेवावर होणा-या नित्यप्रभात मंगलाभिषेकाचा मान एकावेळी फक्त एकाच कुटुंबाला मिळतो. मंदिरात येऊन अथवा ऑनलाईन पध्दतीने या अभिषेकासाठी वेळ नोंदणी (अॅडव्हान्स बुकींग) करावी लागते.
पंचामृत अभिषेका प्रमाणेच पूजा होते. प्रतिक्षेत असलेल्या भाविकांच्या संखेनुसार अभिषेकासाठी आपला क्रमांक लागतो. व त्यांच्याकडून अभिषेक करून घेतला जातो. पंचामृत अभिषेक करण्याची अनेक भाविकांची मनस्वी इच्छा असते. मात्र त्यासाठी मोठी वेटिंग (प्रतिक्षा) असते व थोडी जास्त दक्षिणा लागते. त्यामुळे ज्या भाविकांना पंचामृत अभिषेक करणे अशक्य नसेल त्यांच्यासाठी नित्यप्रभात मंगलाभिषेक उत्तम पर्याय आहे. यासाठी लागणारी दक्षिणा प्रत्यक्ष अभिषेक अभिषेकापूर्वी संस्थेच्या बँक खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे. किंवा मंदिरात समक्ष येवून देणे आवश्यक आहे.
नित्यमंगलाभिषेका नंतर सकाळी ७ वाजता होणाऱ्या आरतीचा मानही अभिषेक करणाऱ्या भाविकालाच मिळतो.
वार- सोमवार, बुधवार,गुरुवार,शुक्रवार,शनिवार,रविवार
वेळ - सकाळी ५.०० ते ७.०० (२ तास )
दक्षिणा- ५४०० रु
भाविकांच्या अनुपस्थितीत होणारे अभिषेक
Read More
काही भाविकांना त्यांचे वयोमान, आजारपण, नोकरी अथवा व्यवसाय इ. कारणांमुळे प्रत्यक्ष मंदीरात येऊन अभिषेक करणे शक्य नसते अश्या भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वतः मंदिरात न येताही मंदिरामार्फत अभिषेक करून घेता येतात.
दर आठवड्याला मंदिरात अभिषेकासाठी न येवू शकणाऱ्या भाविकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येते. व श्री मंगळदेव ग्रहांचा वार असलेल्या मंगळवारी स्वतंत्र्यपणे गुरुजीं मार्फत अशा भाविकांच्या नावाचा संकल्प सोडून त्या व्यक्तींच्या गोत्राचा व नावाचा व्यक्तीगत उल्लेख करण्यात येतो. 1 तास चालणाऱ्या अभिषेकात पूर्ण विधीवत रित्या ही प्रक्रिया पार पाडण्यात येते. अभिषेक झाल्या नंतर भाविकांना रजिस्टर्ड पोस्टाद्वारे प्रसाद पाठविण्यात येतो. सोबत त्यांना अभिषेकाची पावतीही पाठविण्यात येते. यासाठी लागणारी दक्षिणा संस्थेच्या बँक खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे. किंवा मंदिरात समक्ष येवून देणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त भाविकांची इच्छा असेल तर व्हिडिओ कॉलिंग वर सुद्धा अभिषेक केले जातात यासाठी भाविकांनी आधी मंदिर प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे.
दक्षिणा - ८१० रु (प्रतीव्यक्ती)
स्वतंत्र (स्पेशल) अभिषेक
Read More
वर्षभर दर मंगळवारी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात अभिषेक होतातच कोणत्याच मंगळवारी अभिषेक बंद नसतात. मंगळवारी मोठ्या संखेने भाविक संपूर्ण भारतातून अभिषेक करण्यासाठी जमतात परिणामी अश्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी मंदीर प्रशासनाकडुन नियोजनपूर्वक व शिस्तबद्धरित्या सामूहिक पध्दतीने अभिषेक केले जातात. भाविकांना उपस्थित भाविकांसोबत गुरुजींच्या सूचनांचे पालन करून अभिषेक करून घ्यावा लागतो.
ज्या भाविकांना सामुहीक पद्धतीने अभिषेक करण्याची इच्छा नसते असे भाविक त्यांच्या इच्छेनुसार 'स्वतंत्र्य अभिषेक करवुन घेवू शकतात.
'स्वतंत्र्य अभिषेक पुजेत भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. ज्यात एक गुरुजी एकावेळी एकाच भविकाचा अभिषेक करवुन घेतात. ज्यात त्या भाविकाला पुजे बद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. अभिषेक करणाऱ्या सोबत त्या भाविकाच्या कुटुंबातील सदस्य मागे बसतात. यासाठी लागणारी दक्षिणा अभिषेकापूर्वी संस्थेच्या बँक खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे. किंवा मंदिरात समक्ष येवून देणे आवश्यक आहे.
वार - रोज
वेळ - सुमारे सव्वा तास
दक्षिणा - ५४०० रु
भोमयाग
Read More
खासकरून ज्यांचा व्यावसायिक संबंध रेती, शेती या मातीशी असतो असे भाविक म्हणजेच शेतकरी, सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्ट, बिल्डर , डेव्हलपर व ब्रोकर यांच्यासाठी भोमयाग खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. संपूर्ण विश्वात भूमिपुत्र ( श्री मंगळ ग्रह) व भूमिमाता यांच्या मूर्ती एकाच ठिकाणी फक्त आणि फक्त अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरातच आहे. त्यामुळे भूमिमाता व भूमिपुत्र यांच्या सान्निध्यातील श्री भोमयाग प्रचंड प्रभावी ठरण्याची भाविकांची श्रद्धा आहे. भोमयाग हवनात्मक पद्धतीने होतो. हा याग करण्यापूर्वी संस्थेच्या बँक खात्यात दक्षिणा जमा करणे अत्यावश्यक आहे. किंवा मंदिरात समक्ष येवून देणे आवश्यक आहे.
वार - मंदिर व्यस्थापनाशी संपर्क साधून तारीख मिळवावी.
वेळ- 3 तास
दक्षिणा- ९०००/